Posts

शिवाजी महाराज द रिअल Management गुरू

*दिवाळीमध्ये किल्ला का बांधतात रे दादा??* एका मुलाने विचारलेला सुंदर असा प्रश्न.... खरंतर हि गोष्ट आपल्याला सुद्धा माहीत पाहिजे की दिवाळीमध्ये किल्ला का बांधतात?? आणि किल्ला बांधता बांधता मुलांना कोणती कौशल्ये शिकायला भेटतात?? जेव्हा १९ फेब्रु १६३० रोजी युगपुरुष,युगकर्ते,शककर्ते,विश्ववंदनिय *छत्रपती* *शिवराय* यांचा जन्म झाला त्याच्या ३ ते ४ वर्षांपासून या प्रथेला सुरुवात झाली....           हि नुसती प्रथाच नाही तर ही एक कला आहे आपलं भविष्य घडविण्याची. हीच कला तर *माँसाहेब जिजाऊंनी*  बाळ *शिवबांना* शिकविली... लहानपणसून *शिवराय* छोटे छोटे किल्ले बांधत असत आणि त्यावर वेगवेगळ्या संकल्पना करून त्याला design करत असत... असं करता करता *शिवराय* मोठे झाल्यावर त्यांनी खरे किल्ले घेण्यास सुरुवात केली बघता बघता तोरणा किल्ला,संग्रामदुर्ग,सिंहगड,पुरंदर किल्ला असे बरेच किल्ले त्यांनी आपल्या स्वराज्यास जोडले... मग दिवाळीच्याच दिवशी का बरं किल्ला बांधतात?? याचं उत्तर शोधता शोधता लक्षात आलं की दिवाळी हा सण म्हणजे जोशाचं प्रतीक,आनंदाचं प्रतीक,जल्लोषाचं प्रतीक,आत्मविश्वासाचं प्रतीक म्हणून याच दि

शिवाजी महाराज द रिअल Management गुरू

*छत्रपती शिवरायांनी* सुरतेची लूट केली... पण त्यानंतर *गुजरात* मधील लोकांच्या मनात खूप सारे गैरसमज तयार झाले *छत्रपती शिवराय* लुटारू होते, ते चोर होते त्यांनी आमच्या राज्यातील खजिना लुटून नेला होता.. हे त्यांच्या मनातील गैरसमज कुठेतरी दूर झाले पाहिजेत.. अजूनही तुमचे कोणी *गुजराती* मित्र असतील तर त्यांना विचारा, कि काय हो तुमच्या राज्यात *शिवरायांच्या* बद्दल काय बोलले जाते, सहाजिकच ते वाईटच बोलणार, कारण त्याकाळापासुन इंग्रज लोकांनी त्यांच्या मनात तसे गैरसमज तयार केले होते.. *गुजरात* मध्ये मुघलच नाही तर इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्या वखारी होत्या , आणि आपल्या राज्याची झालेली नुकसान भरपाई काढण्यासाठी *शिवरायांनी* सुरतेवर हल्ला केला..        🚩 *जय शिवराय*🚩              आपला दिवस आनंदात जावो हीच राजे *शिवछत्रपती* आणि *शंभूछत्रपतींचरणी* प्रार्थना..

शिवाजी महाराज द रिअल Management गुरू

आयुष्यात जन्माला आलेत तर एकदा तरी शिवजन्मस्थान *शिवनेरी* आणि शिवतीर्थ *रायगड* या दोन किल्यांवर भेट देऊन या... नाहीतर जन्माला येऊन आपला काहीच फायदा नाही.. किल्यांवर नुसतं फिरू नका तेथील माहिती मिळवा, तेथे जाऊन शिवरायांच्या मूर्तीला वंदन करा.... *देवा कडे मदत मागून देव मिळाला नाही पण माझ्या शिवरयांच्याकडे मदत मागून लोकांना देव मिळाला*       🚩   *जय शिवराय*🚩               आपला दिवस आनंदात जावो हिच राजे *शिवछत्रपती* आणि *शंभूछत्रपतींचरणी* प्रार्थना...

शिवाजी महाराज द रिअल Management गुरू

*छत्रपती शिवरायांएवढे* हुशार व्यक्तिमत्व संपूर्ण आशिया खंडात सुद्धा पाहायला मिळणार नाही.... जेव्हा शत्रू चाल करेल तेव्हा शांत राहायचे, जेव्हा शत्रू गाफील (शांत) राहील तेव्हा त्याच्यावर अचानक आक्रमण करायचे.. अशी *शिवरायांची* युद्धनीती होती... एवढं सगळं याच्यासाठी करावं लागलं कारण *शिवरायांकडे* सैन्यबळ कमी होते... नाहीतर *औरंगजेबासारखी* ३० लाखाची फौज जर *शिवरायांकडे* असती तर *औरंगजेब* केव्हाच संपला असता...      🚩    *जय शिवराय*🚩 आपला दिवस आनंदात जावो हीच राजे *शिवछत्रपती* आणि *शंभूछत्रपतींचरणी* प्रार्थना..